नवीन लाभार्थी लाडकी बहीण योजनेची गावानुसार यादी जाहीर । सरकारी माहिती

ladki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार, या वर्षीच महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. या योजनेत महिलांना 1500 रुपयांच्या सहाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का? असे तपासा.
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटींची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात यापूर्वी वर्ग करण्यात आले होते. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान 1500 रुपयांच्या हिशोबाने एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी नोव्हेंबरचा हप्ता वर्ग झाला होता. आता डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात आजपासून जमा होणार आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता महिनाअखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेनुसार अधिवेशन संपल्यानंतर महिलांना 1500 रुपयांचा हप्ता दिला जाईल. डिसेंबर हप्त्याचे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.
किती महिलांना मिळणार लाभ?

डिसेंबरचा हप्ता दोन टप्प्यांत वितरित केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपये मिळतील. दुसऱ्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे आलेल्या उर्वरित 25 लाख अर्जदार महिलांना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल.
2100 रुपयांच्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार

महायुतीने लाडकी बहीण योजनेतील हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. मात्र, सध्या डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच हप्त्याची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे 2100 रुपयांच्या हप्त्यासाठी महिलांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही, येथे तपासा.

Leave a Comment